पहिल पत्र दिलं या महाराष्ट्रात की SIT लावा - पंकजा मुंडे
पहिल पत्र दिलं या महाराष्ट्रात की SIT लावा - पंकजा मुंडे


पत्रकार : संतोष देशमुख प्रकरणातील आठ आरोपींना मोक्का लावलेला आहे. त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया?
उत्तर : ” काय असणार माझी प्रत्येक क्रिया, एका मला माहिती नाही लावलेला आहे मला माहित नाही बैठकीत होते नक्कीच आमचे मुख्यमंत्री आमचे गृहमंत्री आहेत आणि आश्वासन दिलेला आहे. दिलेलं आहे फ्लोअर वर विधानसभेच्या की योग्य कार्यवाही करेन, कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे. ते का तरुणाचा निर्गुण हत्या झाली आहे. त्यामुळे कारवाई त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचे कारवाई वेगळी आहे. आणि ज्यांनी हत्या केली आहे. त्यांची कारवाई त्यांनी काय केले तुमचा प्रश्न बरोबर आहे का? प्रश्न बरोबर आहे का मी आत होते. त्यांनी कारवाई केली असेल तर ती विचारांतीच केली असेल. आणि इन्वेस्टीगेशन मध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही.”
पत्रकार : या सगळ्या प्रकरणावर राजकारण केलं जातंय असं सगळ्याच बाजूनं चर्चा सुरू आहे?
उत्तर : कालच पुण्यामध्ये एका तरुणीची वाईट हत्या झाली. एका मुलाने सगळ्या लोकांसमोर तिला मारलं ह्या घटना सगळीकडेच घडत आहेत. या घटना वाईटच आहेत तर अशा घटना थांबवण्याकरिता कडक शासन झालं पाहिजे.
पत्रकार : बीडच्या घटने वरून राजकारण होतंय?
उत्तर : ” हे पहा कोणतीही घटना जेव्हा होते. मग ती एखाद्या दोन गटातील भांडण असो. दोन समुदयां मधला प्रश्न असो, किंवा निर्घृण हत्या असो, ज्यांना याच्यात राजकारण करायचे आहे. त्यांच्यासाठी तर मंच आहे ना,”
पत्रकार : बीडच्या या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो विरोधकांकडून,एक सहकारी मंत्री आणि बहिण म्हणून तूमची काय प्रतिक्रिया आहे.
उत्तर : “हे पहा मी याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी कोट करेन की यावर अजित पवारांनी यांवर प्रतिक्रिया द्यावी.ते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करायचं माझं काही कारण नाही. ते जर म्हणताय की त्यांना जो पर्यंत शोध लागत नाही. तोपर्यंत कारवाई करण अनुचित आहे.आणि जर अजित पवार म्हणतात की जर शोधला, कोणाचा ही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही. काल मी त्यांचं वाक्य ऐकलं की माझं जरी नाव आलं तरी ते मला सोडणार नाही. हे त्यांनी म्हटलंय तर या विषयाला रोज रोज प्रतिक्रिया देन योग्य नाही.”
पत्रकार : सुरेश धस हे तुमच्या बद्दल बोलताय की पंकजाताई तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही गप्प का?
उत्तर : मी बोलत आहे ना कुठे गप्प आहे.कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काय कारण नाही. मी पहिल पत्र दिलं या महाराष्ट्रात की SIT लावा म्हणून, मी परवा प्रेस काॅन्फरंस घेतली.तुमचाच होमवर्क कमी आहे.तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही.
पत्रकार : या प्रकरणात परळीच गुन्हेगारीकरण याच्यावर आता बारीच चर्चा होऊ लागली आहे. खरंच गुन्हेगारी परळीत झाली का? त्यावर तुमचं मत काय?
उत्तर : ” त्यांच्यामुळे तर बीड खरच बदनाम झालेलेच आहे. शेवटी या विषयाची जी मांडणी झालेली आहे संपूर्ण देशभर या विषयाचा ज्या पद्धतीने मांडणी झालीये राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहत एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे जिल्ह्यांनी एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू शिरसागर, रजनीताई पाटील, प्रितम मुंडे विमलताई मुंदडा पालकमंत्री राहिल्या आहेत. मला वाटतं ज्या जिल्ह्यात लोक इतके स्वाभिमानी आहेत.की सगळ्यात कष्टाचा जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते का नाही तर दरोडा करायला गेले असते लोक काम कशाला करायला गेले असते त्या जिल्ह्याविषयी अशा पध्दतीने पाहत असतील तर माझ्याकडे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातील आढावा आहे. पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात पुण्यात अजून सुद्धा मुळशी पॅटर्न सुरू आहे. नागपूर मध्ये मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं आणि म्हणून तिला नाक घासून पाया पडून माफी मागावी लागली अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत. आणि म्हणून ही घटना निर्गुण आहे तिचा मी तीव्र निषेध केलेला आहे. वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असली तर त्यावेळी मी भूमिका बोलला असता पण दुसऱ्याच्या भूमिकेत मी हस्तक्षेप करणार आहे माझं काम नाही माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देतात त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला वेगळ्या पद्धतीने हवा देणे हे योग्य आहे असे मला वाटत नाही नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असते आणि माझे मुख्यमंत्री जेव्हां विधानसभेत शब्द देतात याच्या नंतर परत परत त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणे हे योग्य आहे असं मला वाटत नाही.”
पत्रकार : बीडच्या पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मध्ये रस्सीखेच आहे हे खर आहे का?
उत्तर : “काही ऋषिकेश नाहीये तुम्ही काही बोलत जाऊ नका हो काही बोलताय तुम्ही आणि किती बालिशपणा आहे तुमचा माझा विषय काय आहे बोलताय काय आमच्यात का रसिक येत असेल मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी प्रचार केलाय आम्ही दोघे एकमेकांच्या युतीमुळे एकमेकांवर काम केले रस्सी घेत असल्याचा असं काही कारण नाहीये मी तर सांगितले की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित दादांनी व्हावं आमची काही हरकत नाही.” असे त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला.