छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीयविधानसभा
Trending
मनपा निवडणुकीत शिवसेनेची "एकला चलो रे ची" भूमिका

नागपूर पासून मुंबई पर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार – खा.संजय राऊत महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची ‘एकला चलो रे ची’ भूमिका समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली आहे ते असे म्हणाले की ‘नागपूर पासून ते मुंबई पर्यंत आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, ‘एकदा आम्हाला पाहायचंच आहे.’ ‘जे होईल ते होईल’ लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित लढणारे घटकपक्ष महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आता महानगर पालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे.
