कृषीछत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रहवामान
Trending
दिवसभर आभाळ आणि रात्री थंडी
अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे "-हवामानतज्ञ

छत्रपती संभाजीनगर : पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण असणार आहे तसेच या काळात अवकाळी पाऊस व गारपीट शहर आणि परिसरात होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी दर्शविला आहे.काल कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून सलग कडाक्याची थंडी होती. दिवसा ढगाळ वातावरण तर सायंकाळी पुन्हा थंडी सुरू वातावरण आहे.

तर अशा वातावरणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“तसेच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणअसणार आहे थंडीही जाणवेल तसेच अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे “-हवामानतज्ञ