एस.टी.च्या ताफ्यात,२५०० हजारांहून जास्त बसगाड्या दाखल होणार
टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल असं सरनाईक म्हणाले.

ठाणे : राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.च्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल,

असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.याप्रसंगी १७ नव्या गाड्यांचं लोकार्पणही झालं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल असं सरनाईक म्हणाले. याचा पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना, त्यांच्या गणवेशापासून – विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावून होईल असं सांगून त्याद्वारे एसटी कर्मचारी प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतील असं ते म्हणाले