युट्युबर रणवीर अलाहाबादियाचं आक्षेपार्ह वक्तव्य! त्यास पडले महागात.
जवळजवळ २ मिलियन लोकांनी त्याला अनसबस्क्राईब केले

द फ्रेम न्यूज नेटवर्क
रणवीर अलाहाबादिया हा प्रसिद्ध युट्युबर आहे. तो त्याच्या पॉडकास्ट साठी ओळखला जातो. युट्युब वर त्याचा ‘ बियर बायसेप्स ‘ हा पॉडकास्ट शो खूप फेमस आहे. या शो मध्ये तो मोठमोठ्या सेलिब्रिटींना, नामांकित व्यक्तींना शोमध्ये बोलवून अनेक विविध विषयांवर तो चर्चा घडवून आणतो. तसेच तो या शोमध्ये बॉलीवूड मधील अनेक कलाकार, राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी, आणि औद्योगिक क्षेत्रातील, उद्योजक मंडळींना, पॉडकास्ट शो मध्ये बोलावून त्यांची मुलाखत घेत चर्चा करत असतो.

त्याचे युट्युब वर १०.५ मिलियन सबस्क्राईबर्स आहेत. आणि त्याच्या शोला चांगलीच पसंती ही मिळत आहे. पण रणवीर अलाहाबादिया सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलेला आहे. रियालिटी शो ‘इंडिया गॉट लेटेंट’ मध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला. त्याने या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकाला पालक आणि त्यांच्या लैंगिक संबंधाबद्दल प्रश्न विचारणारा रणवीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे त्यामुळे सोशल मीडियातील नेटकर्यांनी रणवीरला चांगलेच धारेवर धरलं आहे. त्याच्या आक्षेपार्ह प्रश्नांमुळे सोशल मीडियामध्ये त्याला प्रचंड टोल करत आहेत. त्याला बायकॉट आणि त्याच्यावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी सोशल मीडियातून होत आहे. तर त्याच्या फॉलोवर्स ची संख्या सुध्दा कमी होताना दिसत आहे. जवळजवळ २ मिलियन लोकांनी त्याला अनसबस्क्राईब केल्यामुळे रणबीरला चांगलाच फटका बसला आहे. तरी या प्रकरणाविषयी रणवीरने एक्सवर माफी सुद्धा मागितली आहे.