राहुल सोलापूरकर विरोधात वंचित बहुजन आघाडी, रिपाइं ,भीम आर्मीचं एकत्रित आंदोलन..!
ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा" - आंदोलनकर्ते

द फ्रेम न्यूज नेटवर्क
पुणे : वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि भीम आर्मी कार्यकर्त्यांचं अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यानंतर आता त्यांनी भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी आंबेडकर अनुयायींनी आंदोलन सुरू केल आहे.
हल्लाबोल, हल्लाबोल” ” राहुल सोलापूरकरला अटक करा”, “त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा”, “आम्ही काही झालं तरी त्याच्या घरात घुसणार”, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तसेच आंदोलन करत्यांनी पोलिसांनाही प्रश्न उपस्थित केले आहेत.
“तुम्ही राहुल सोलापूरकर सारख्या व्यक्तीला सुरक्षा पुरवू नका? त्याला पाठीशी घालू नका? त्यावर कायदेशीर कारवाई करा”! अशी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांसमोर मागणी केली आहे. राहुल सुलापूरकरांच्या घरासमोर मोठा पोलीस फौज फाटा आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा घोषणा देत वंचित, रिपाई, भीम आर्मीचं राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.
कार्यकर्त्यांचा असं म्हणणं आहे की राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. आणि पोलीस यंत्रणा त्याला सुरक्षा पुरवते हे अत्यंत निंदनीय आहे पोलिसांनी कायद्याचा वापर करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. पण पोलीस त्याला सुरक्षा पुरवते हे निषेधार्थ आहे. शासन राहुल सोलापूरकरला पाठीशी घालत आहे. असं आंदोलन कार्यकर्त्यांनी म्हटल आहे.