छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रलेख
Trending

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाज सुधारणेतील योगदान व कार्य

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य

क्रांतीज्योती ,ज्ञानज्योती ,सावित्रीबाई फुले यांनी समाजहितासाठी केलेले कार्य फार मोलाचे आहे. त्यांनी आपल्या जीवन काळात समाज परिवर्तन घडवून आणले जर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर आजची जी महिला आहे आज चा जो समाज आहे तो नसता कारण तो काळात असा होता की स्त्रियांवर खूप सारी बंधने लादली गेली होती भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या फक्त भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम स्त्री समाजसेविका कवयित्री समंजस अज्ञाधारक पत्नी आणि पहिल्या स्त्री विद्यार्थिनी व मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी ज्ञानरचनाचे धडे त्यांच्या पतीकडून म्हणजेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून घेतले. त्यांना आपण स्त्रियांचे मुक्तिदाता म्हणतो त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाचा विरोध स्वीकारून त्यांनी समाजहितासाठी केलेले समाज परिवर्तन हे आपण आज पाहत आहोत.सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाज जीवनात स्त्रियांचे व्यक्तित्व चूल आणि मूल यापासून दूर करून समाजात मान उंचावून चालण्याचे बळ देण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. भारतीय समाज जीवनात स्त्रियांना शिक्षणात सशक्तिकरणात खूप मोलाची भूमिका बजावली आहे त्यांनी बालविवाहास विरोध सती प्रदेश केशव पण अंधश्रद्धा निर्मूलन विधवा पुनर्विवाह या समाज हिताच्या कार्यासाठी पुढाकार घेत पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेला तोंड देत त्यांनी आपले समाज सुधारणेतील कार्य चालू ठेवले. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप मोलाचे कार्य केले आहे सावित्रीबाई फुले यांना प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण दिले या महान समाज सुधारकांनी आपल्या घरातून स्त्री शिक्षणाला सुरुवात केली सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी अनेक त्रास यातनास सहन कराव्या लागल्या. सनातन्यांनी त्या जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात असेल तेव्हा सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण चिखल फेकला जात होता. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या घरावर दगड धोंडे फेकले जाईल सनातण्यांच्या एवढा मोठा विरोध झुगारून त्यांनी आपले कार्य हे सतत चालू ठेवले होते सावित्रीबाई फुले यांना त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांचा मोठा पाठिंबा आधार होता ज्योतिबा फुले हे पुरोगामी महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक समाजचिंतक होते महात्मा फुले यांनी कष्ट करावे बहुजन समाज दलित स्त्रिया शेतकरी यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली हे सर्व कार्य करीत असताना सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा महात्मा फुले यांच्याबरोबर सनातनी विचारावर आसूड ओढले होते. त्यांनी सर्व जाती धर्माच्या व पंथाच्या समाजाला आधार भाव सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली शिक्षण हे सर्वांगाने समाज सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे अशी त्यांची धारणा होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये काढली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक म्हटले जाते महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण विधवा विवाह पुनर्विवाह अनाथ बाल आश्रम केशव पण जातीपातीचे उच्चाटन यासारख्या सामाजिक सुधारणा केल्या भारत देशातील स्त्रियांना पितृसत्ताक पद्धतीमुळे शिक्षणच काय पण त्यांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते आणि म्हणून महात्मा फुले यांनी जानेवारी १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा पुणे येथे भिडे वाड्यात सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला १९ व्या शतकात स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिले जात होते. स्त्रियांना काडीमोल किंमत नव्हती अशावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी तळागाळातील समाजाला वर आणण्यासाठी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिकविले व नंतर त्यांचीच शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली सावित्रीबाई फुले यांचे पुढील शिक्षण हे सदाशिव बल्लाळ गोवंडे सखाराम यशवंत परांजपे केशव शिवराम जोशी यांच्याकडे शिकून नंतर नगरच्या आत्ताचे (अहिल्यानगर) मिशनरी मिस फेरार यांच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतले व त्यांचे स्त्री शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. १५ मे १९४८ मध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे महार वाड्यात मुला मुलींची शाळा सुरू केली त्यांनी १८५१मध्ये दलित मुलांसाठी शाळा सुरू केली तेथे सावित्रीबाई फुले या शिक्षिका होत्या १८४८ ते १८५१ या वर्षांमध्ये या क्रांती दांपत्याने पुण्यामध्ये एकूण २० शाळा सुरू केल्या. त्यांना सनातनी लोकांकडून खूप विरोध झाला त्यांनी त्यांचा विरोध झुगारून त्यांनी त्यांचे शिक्षण देण्याचे कार्य सुरूच ठेवले सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांची सुधारणा करण्यासाठी श्री सेवा मंडळाची स्थापना समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केली होती. स्त्री शुद्रांना गुलामगिरीतून मुक्त करण्यात करिता त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांना शिक्षण देणे हाच मार्ग आहे त्यासाठी महात्मा फुले यांच्या परमाने सावित्रीबाई फुले यांनी आपले समाज सुधारण्या साठी विचार मांडले आहेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार अनेक कवितांमधून केला आहे ‘अज्ञान’ हा त्यांना माणसाचा एकमेव शत्रू वाटतो ते आपल्या काव्यात लिहितात.

दूर फेकुनी रूढी द्या रे

परंपरेची मोडूनी दारे

लिहिणे वाचणे शिकून घ्या रे

छान वेळ आली.”

असे सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यांमधून सांगितले आहे. सावित्रीबाई फुले या बालकांना विद्यार्थ्यांना उद्देशून लिहितात.

” अभ्यास करी विद्येचा, विद्येस देव मानून

घेणे नेटाने तिचा लाभ मनी एकाग्र होऊन

विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून

तिचा साठा जया पाशी ज्ञानी तो मानतो जन “

त्या स्त्रियां, शुद्रांच्या उन्नतीसाठी त्यांना सुधारण्यासाठी मनुष्यबळ प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे. हे सावित्रीबाई फुले या आपल्या शब्दातून त्यांनी मांडले आहे. समाजाप्रती बालकांप्रती क्रियांसाठी विचार त्यांनी सांगितले आहेत.

सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी लिहिलेल्या कविता

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विचारांतून समाजप्रबोधन करण्यासाठी प्रसार कवितेच्या माध्यमातून त्यांनी साहित्यांच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी काव्यफुले व बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह हे त्यांनी लिहिलेले आहे. त्यांच्या कविता याची साक्ष आहे की त्याकाळची सुद्रांची परिस्थिती गरिबी स्त्रियांचा दर्जा दुर्दशा हे सर्व अज्ञानी रूढीप्रिय असल्यामुळे त्यांना त्यासाठी कवितेतून शिक्षणावर काव्य लिखाण करावे लागले. सावित्रीबाई फुले आपल्या कवितेतून गुलामीच्या बेड्या तोडून देऊन शिक्षण घ्या असे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले आहे त्या काळामध्ये इंग्रजांमुळे शूद्र अति शूद्र आणि स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला होता पण मनुवादी लोक समाजातील प्रत्येक वर्गाला शिक्षण देत नसत त्या काळात स्त्रियांना शुभ्रांना दुःख सहन करत आपले आयुष्य व्यतीत करावे लागत असे परंतु असे जीवन जगताना सनातन यांना मात्र त्यांचे काहीच वाटत नसेल या समाजातील विसंगती साठी सावित्रीबाई फुले म्हणतात.

असे शूद्र युगांवयुगे आभागी

नसे सुख काही सदा दुःख भोगी

पशु सारखे मोन होऊनी राह

अशा या देशाची कुणा लाज नाही “

सावित्रीबाई फुले यांच्या मते इंग्रजी शिक्षण व्यवस्था सुधारणा पशु पासून मुक्त करण्यासाठी आहे हा एक आशेचा किरण आहे त्यामुळे इंग्रजीची त्या प्रशंसा करत आणि शुद्धिरांना इंग्रजी शिक्षा प्राप्त करून घ्या असे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या सांगत आहेत. ” इंग्रजी माऊली देई सत्यज्ञान,

शूद्रांना जीवन, देई प्रेम,

इंग्रजी माऊली शब्दांना पान्हा पाजी,

संगोपन आजी करतेस,

इंग्रजी माऊली, तोडते पशुत्व,

देई मनुष्यत्व,शूद्र लोका “

कवयित्री सावित्रीबाई फुले आपल्या ” बावनकशी सुबोध रत्नाकर ” या काव्यात महात्मा फुले यांना समर्पित करतात आणि लिहितात की,

” करी शुद्र सेवा दिले धैर्य त्यांना

क्रियाशील नेता असा ज्योतिबाचा

नसे जात त्याला, नसे पंथ काही

तया वंदुनी सावित्री काव्य वाही “

या काव्यात सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या विषयी आपल्या काव्य लेखणीत मांडले आहे. कारण महात्मा फुले यांनी समाजाविषयी जे कार्य केले आहे ते खूप मोलाचे आहे. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये व त्यांचे अनुभव स्त्रीची अवस्था शुद्रांची स्थिती हे सर्व काव्यात मांडले आहे. त्यांच्या काही कविता या महात्मा फुले यांनी समाजासाठी केलेले आंदोलन चळवळी त्यांचे वर्णन सावित्रीबाई फुले यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेले आहे. त्यांचे सर्व जीवन शूद्र अति शुद्रांच्या मुक्तीसाठी स्त्री शिक्षणासाठी वाहून घेतलेले होते. त्यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्तही केले होते. त्या काळात आपल्या लेखनातून समाजामध्ये चेतना निर्माण केली. त्यांनी गुलामीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी समाजामध्ये सुधारणा घडविण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या समाज प्रबोधनावर कविता आजही अन्याय अत्याचार विरोधात समाजाला प्रेरक आहे त्यांनी आपल्या कवितेच्या लिखाणातून समाज प्रबोधन केले होते. त्यांचे समाज सुधारण्यामध्ये खूप मोलाचे योगदान आहे.

विद्या दगडू वाघमारे

छत्रपती संभाजीनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button