इंग्लंड विरुद्ध च्या टी २० साठी मोहम्मद शमीच कमबॅक
हे. मोहम्मद शमी चे भारतीय संघात तब्बल १४ महिन्यांनी पुनरागमन झाले आहे.


मुंबई : इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी मोहम्मद शमी चे पुनरागमनइंग्लंड विरुद्ध च्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे कर्णधार सूर्यकुमार यादव च्या नेतृत्वाखाली भारतीय संघात तेज गोलंदाज मोहम्मद शमीला ही संधी देण्यात आली आहे. २०२४ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो संघात पुन्हा ‘कमबॅक’ करत आहे. मोहम्मद शमी चे भारतीय संघात तब्बल १४ महिन्यांनी पुनरागमन झाले आहे.इंग्लंड विरुद्ध च्या टी ट्वेन्टी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे संघात मोठे बदल करण्यात आले आहे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल आणि भारतीय संघाचे उपकर्णधार पद अक्षर पटेलला देण्यात आले आहे . त्याचबरोबर सलामीला संजू सॅमसंग आणि अभिषेक वर्मा हा सुद्धा संघात आहे. तिलक वर्मा त्याबरोबरच आघाडीचा बल्लेबाज रिंकू सिंग याचा सुद्धा संघात समावेश करण्यात आला आहे तसेच संघातील अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे यामध्ये हार्दिक पांड्या नितेश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर लाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार) , संजू सॅमसंग (विकेट कीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितेश कुमार रेडी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, हर्षदीप सिंग, मोहम्मद शमी, वरून चक्रवर्ती, रवी विष्णू, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर). असा संघ घोषित करण्यात आलेला आहे.