अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका
अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका


मुंबई : ९० च्या दशकातले सुप्रसिद्ध बॉलीवूड विनोदी अभिनेते टिकू तलसानिया यांना शनिवारी सकाळी हृदयाचा झटका आला त्यांची प्रकृती चिंताजनक आहे टीकू तलसानिया सध्या रुग्णालयात दाखल आहेत मीडिया रिपोर्टनुसार सत्तर वर्षे टिकू तलसानिया यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे तपासात समोर आले आहे . टिकू यांनी अनेक कॉमेडी शो आणि सिनेमा मालिकांमध्ये काम केले टिकू शेवटी आपल्याला २०२४ मध्ये आलेल्या विकी विद्या का ओ वाला व्हिडिओ सिनेमा दिसले होते. टिकू यांना आपण ‘सर्कस’, ‘स्पेशल२६’,’ फिर हेरा फेरी’,’ हंगामा, ‘रिश्ते’ ,’देवदास’अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिले टिकू यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे पण ते उपचार घेऊन लवकरात लवकर बरे व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.