महाकालच्या जयघोषात श्री नर्मदेश्वर महादेव, श्री मुंजा बाबाची शोभायात्रा
जुना मोंढा ढोरपुरा रोहिदासपुरातील नागरिकांच्या वतीने भव्य महाप्रसाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर | दि. २१ : शहरातील जुना मोंढा ढोरपुरा रोहिदासपुरातील नागरिकांच्या वतीने श्रीनर्मदेश्वर शिवलिंग, श्री मुंजा बाबा तसेच प्रयागराज येथील महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे गुरुवारी (दि.२०) आयोजन करण्यात आले होते. संगीता सांगळे यांच्या हस्ते श्री श्रीनर्मदेश्वर शिवलिंग, श्री मुंजा बाबा देवाचे पूजन करून फटाक्यांच्या आतषबाजीत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. मराठमोळ्या वेशभूषेत नागरिकांनी सहभाग नोंदवत महादेवाचा जयघोष केला.
साडेतीनशे वर्ष जुनी परंपरा असलेल्या श्री नर्मदेश्वर शिवलिंग, श्री मुंजा बाबा यांची शोभायात्रा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. महाकुंभ मेळा जो केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर हिंदू संस्कृतीच्या अखंडतेचे, सामाजिक समरसतेचे आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. भवानीनगर,जुना मोंढा, ढोरपुरा, रोहिदासपुरातील सर्व स्थानिक रहिवाशांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
महाकुंभ: आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक असून हि परंपरा अनंत काळापासून आजतागायत अखंडपणे सुरूच आहे. या शोभायात्रेत दिनेश कावळे,ऋता कावळे, राहुल कावळे, अर्जुन कावळे, दिपा अर्जुन कावळे,गंगासागर अशोक कावळे,विशाल प्रकाश कावळे,अंकुश किशोर कावळे,नरेंद्र कावळे,संजीवनी कावळे,ज्ञानेश्वर सुरडकर,प्रदीप साबणे संगीता शिंदे,प्रेम साबणे,गणेश गायकवाड, गोपाल कस्तुरे, हेमंत सरोने,हिमांशू श्रावणे, अशोक गायकवाड, अरुण निकम,अनिकेत इंगोले, किशोर लोखंडे, भूषण कुलकर्णी सुमित थोरात, तेजस कावळे,संजय खरटमल, अमोल इंगळे,राजू कावळे,अशोक कावळे,अमोल कावळे, मनोज कावळे,अरविंद कावळे, हर्षदा कावळे, नगुबई इंगोले,लता इंगोले, पुष्पा गुधनीये यांनी पुढाकार घेतला. साडेतीनशे वर्ष जुनी परंपरा असलेल्या श्री नर्मदेश्वर शिवलिंग, श्री मुंजा बाबा यांची शोभायात्रा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. महाकुंभ मेळा जो केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर हिंदू संस्कृतीच्या अखंडतेचे, सामाजिक समरसतेचे आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. यानिमित्ताने शुक्रवारी (दि.२१) श्री नर्मदेश्वर शिवलिंग चा प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान तर शनिवारी (दि.२२) रोजी भव्य महाप्रसादाचे अयोजन दुपारी १२.३० दरम्यान करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.