याद राखा परवानगी शिवाय खोदाल रस्ता तर होईल जेल.!
विनापरवानगी रस्ता खोदल्यास फौजदारी कारवाई होणार

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात सिमेंट आणि डांबराचे रस्ते बनवतात. पण काही नागरिक स्वतःच्या घरात तील नळ कनेक्शन आणि ड्रेनेज करिता तसेच काही नागरिक छोट्या छोट्या कारणांकरिता रस्ता खोदत असल्याचे प्रकार वाढले आहेत. रस्ते जागोजागी खोदून ठेवतात आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात. आणि रस्त्यावरील वाहनांना, नागरिकांना ह्या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. कारण एकदा रस्ता खोदला तर मग त्या रस्त्यांची दुरवस्था होते. पूर्वी महानगरपालिका डांबरी रस्ते तयार करत होते. पण हे रस्ते दीर्घकाळ टिकून राहत नाहीत म्हणून आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापरून सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहेत . एक किलोमीटरच्या अंतराचा डांबरीकरण रस्ता तयार करण्याकरिता ७० ते ८० लाख रुपये खर्च येतो तर तर सिमेंट करिता एक ते दीड कोटी रुपये इतका खर्च येत असतो. त्यामुळे आता भविष्यात विनापरवाना रस्ता खोदल्यास मनपा थेट नागरिकांवर फौजदारी कारवाई करणार आहे. ” आमच्याकडे तक्रार आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडून अगोदर शहानिशा केली जाते. त्यानंतर कारवाईचे आदेश दिले जातात.” – ए.बी. देशमुख ( शहर अभियंता)