ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबई
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयास प्रताप सरनाईक यांनी भेट.
अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे.

द फ्रेम न्यूज
बंगळूर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात भेट दिली. यावेळी कर्नाटकचे परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी व अन्य अधिकारी उपस्थित होते. कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ‘प्रतिष्ठित सेवा’ अतिशय लोकप्रिय असून राज्य परिवहन व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मंत्री श्री. सरनाईक यांनी अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेससह इतर बसेसची पाहणी केली.