‘छावा’ चित्रपटाचा नायक विकी कौशल छत्रपती संभाजीनगरात दाखल.घेतल घृष्णेश्वराचं दर्शन

फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याकरिता विकी कौशल आज छत्रपती संभाजीनगर येथे चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी शहरात दाखल झालेला आहे. आल्यानंतर त्यांने थेट जिल्ह्यातील सुप्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरात शिवलिंगाचे पूजन केले. केल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन कसं वाटलं विक्की म्हणाला ” बहुत अच्छा लगा; ” मी पहिल्यांदाच आलोय छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर आम्ही सरळ थेट घृष्णेश्वर मंदिरात जाऊन पूजन केलं. सगळ्यांकरिता आशीर्वाद मागितले खूप चांगलं वाटलं मला.”

क्रांती चौकात विकी कोशलचं चाहत्यांकडून जंगी स्वागत विकीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यानंतर विकी कौशल छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. क्रांती चौकात विकी कौशल येणार आहे त्याला पाहण्याकरिता सकाळपासून चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
यामध्ये युवा चाहत्यांची गर्दी जास्तच होती.त्याला पाहण्यासाठी उत्सुकता होती. विक्की कौशल करिता क्रांती चौकात स्वागतासाठी ढोल नगाडे वाजवत विक्की कौशलचं स्वागत करण्यात आलं “जय भवानी,” जय शिवाजी,” जय शंभुराजे ” अशा घोषणा देत विक्की कौशलचं स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना फुल आणि पुष्पहार अर्पण करून हाती भगवा झेंडा घेऊन “जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय” अशा घोषणा देत संपूर्ण क्रांती चौक परिसर दणाणून गेला होता.