ताज्या बातम्यापुणेमनोरंजनमहाराष्ट्र
अभिनेता स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण;घेतली नवी कोरी ‘रेंज रोव्हर डिफेंडर’ कार..!

द फ्रेम न्यूज
आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील सगळ्यांचा आवडता चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख असलेला सर्वांचा लाडका सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशीची स्वप्नपूर्ती झाली आहे. स्वप्नीलने नवी कोरी ‘रेंज रोव्हर डिफेंडर’ कार घेतली आहे. ही कार घेणं स्वप्नीलचं स्वप्न होतं ते आता पूर्ण झालं आहे. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.”डिअर जिंदगी, आजचा दिवस नक्कीच खास आहे. आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे.”

” बाबांना नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणीचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं,” असं स्वप्नीलने म्हटलं आहे.स्वप्निल जोशी ची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.