'छावा' चित्रपटाचा विशेष शो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छावा चित्रपटातील संतोष जुवेकर व अन्य कलाकार, प्रॉडक्शन टीमचे अभिनंदन केले

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्री व विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित केलेला #छावा चित्रपटाचा विशेष शो पाहिला. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, विधिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
” वीर पुरुष छत्रपती संभाजी महाराज ११ भाषा अवगत असणारे, संस्कृत पंडित, कवी आणि लेखक होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केला, मात्र, ‘छावा’ चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून त्यांचा खरा इतिहास जीवित केला ” – मुख्यमंत्री