कामठ्यात उद्या पासून खंडोबा यात्रेला सुरुवात
देशात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून प्रसिद्ध

द फ्रेम न्यूज नेटवर्क
पत्रकार (राजकिरण गव्हाणे)
देशात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कामठा येथील खंडोबा यात्रेला दिनांक २७ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे या दिवशी सविना निघणार आहे.
मुख्य पालखी सोहळा दिनांक २८ जानेवारी मंगळवारी दुपारी एक वाजता निघणार आहे. या यात्रेमध्ये पालखीला विशेष महत्त्व आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात पालखीला प्रारंभ होतो मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात खंडोबाचे वारू चाबकाने वार हातावर पायावर घेत भाविक नाचत असतात.

गावातून पालखी फिरवताना भाविक टिपरे बताशांचा प्रसाद व पालखीवर शाल पांघरून दर्शन घेतात दरम्यान गावाच्या मध्यभागी बुरुजाजवळ दिगंबर हैबतराव डांगे हा भाविक नंगी तलवारीने स्वतःच्या पाठीवर पोटावर पाच वार घेतो हे रोमहर्षक दृश्य पाण्यासाठी दर्शकांची मोठी गर्दी होते.
शेवटी मंदिराजवळ भक्त लोटांगण घेतात त्यावरून पालखी मंदिरात जाऊन विसर्जित होते. खंडोबाची यात्रेला प्राचीन व ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून महाराष्ट्रातून सर्व जाती धर्माची भाविक मोठ्या संख्येने येतात आणि राष्ट्रीय सलोखा ऐक्य असणारे दृश चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळते.
दि. २९ व ३० रोजी भव्य अशा शंकर पट स्पर्धा ठेवण्यात आल्या असून दिनांक ३१ रोजी जंगी कुस्त्यांचे सामने होणार आहेत. शंकरपट कुस्त्यांचे उद्घाटन वेळी खा. अशोकराव चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, खा. रवींद्र चव्हाण, अमर राजूरकर, आ. श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि. प. सीईओ मीनल करणवाल, सौ. मीनलताई खतगावकर, संभाजी धुळगुंडे, पो.नि. चंद्रशेखर कदम, तिरुपती कदम, बालाजी काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.