उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने' सन्मानित.!
"हा पुरस्कार प्राप्त होणे हे मी माझे सौभाग्य समजतो"- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

द फ्रेम न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे.नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी केंद्रीयमंत्री तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व शिंदेशाही पगडी असे आहे.

कार्यक्रमा वेळी मंचावर स्वागताध्यक्ष माननीय शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,आयुष मंत्री प्रतापराव, पद्मविभूषण राम सुतार ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे सरहदचे संजय नाहर दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे आणि लेशपाल जवळगे आधी मंचावर उपस्थित होते. केली.पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये ‘सरहद’ संस्थेला देण्याचे एकनाथ शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.
यावेळी शरद पवार म्हणाले की “अलीकडच्या काळात नागरिक प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे त्यांनी कधीही पक्षीय अभी निवेश मनात न ठेवता जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चितच होईल”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रणांगणात कामगिरी पत्ते करणाऱ्या मावळ्यांना सोन्याचे कडे दिले जात होते. महादजी शिंदे यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सोन्याचे कडे आहे, तसेच हा पुरस्कार प्राप्त होणे हे मी माझे सौभाग्य समजतो”, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.