आंतरराष्ट्रीयक्रीडाताज्या बातम्यामुंबई
Trending
' चॅम्पियन्स ट्रॉफी ' करिता भारतीय संघाची आज होणार घोषणा..!
स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य

मुंबई : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मुख्यालयात होणार आहे. राष्ट्रीय निवड समितीसह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही यावेळी उपस्थित राहणार आहे. भारतीय संघाची निवड झाल्यानंतर दुपारी १२:३० वाजता मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि रोहित हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.