बहुप्रतीक्षीत 'आझाद' चित्रपट प्रदर्शित, पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी रुपये
चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक

Azaad Box Office Collection : अभिनेता अजय देवगणचा पुतण्या अमन आणि रवीना टंडनची लेक राशा थडानी यांचा मुख्य भूमिकेत असलेला ‘आझाद’ सिनेमा शुक्रवारी (१७ जानेवारी रोजी) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. २०२५ मधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत असलेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या कमाईचे आकडे आता समोर आले आहेत.
आझाद’ चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत अमन देवगण आणि राशा थडानी यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा ट्रेलर आणि ‘उई अम्मा’ या जबरदस्त गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली होती. शिवाय या चित्रपटात अजय देवगण देखील विशेष भूमिका आहे.पण या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ‘ आझाद ‘ चित्रपटाने पहिल्या दिवशी संपूर्ण देशभरात फक्त दीड कोटी रुपयांची कमाई केली. अशी माहिती मिळत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आझाद चित्रपटाने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची ओपनिंग खूपच संथ आहे. त्यामुळे हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.