छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय

मी यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही

अभंगई येथील कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अंभई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना एक घोषणा केली. ते म्हणाले की “मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही ”  निवडणूक का लढवणार नाहीत त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की मी आमदार मंत्री असताना १८ १८ तास सारखे काम केले शासकीय योजनेचा लाभ अनेकांना मिळवून दिला मतदारसंघाचा विकास केला. तसेच कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली सिल्लोड, सोयगाव मतदार संघाचा विकास केला. सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, एमआयडीसी आणली शेतकरी बागायतदार व्हावा यासाठी पूर्णा नदीवर बेरीजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी घेतली. आमदार व मंत्री असताना कोट्यावधी रुपयांचा निधी आणला पण विरोधक काहीच कामे न करता त्यांना माझ्या बरोबरीने मला मतदान मिळते, विरोधक जातीपातीवर निवडणूक लढवतात हे राजकारण घातक आहे. जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जाती-पातीवर निवडणुका होत असतील. तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पण मी आता यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही. ते पुढे असे म्हणाले की माझा विजय केवळ २४२० मतांनी झाला. कारण लोकांना विकास नकोय जाती-पातीवर निवडणुका होत असतील. तर आगामी सिल्लोड ची नगरपरिषद माझी शेवटची निवडणूक राहील, यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button