आठवड्यातून 90 तास कामाचा सल्ला देणाऱ्या सुब्रह्मण्यम यांना आदर पूनावालांनी 'ट्विटरवर पोस्ट' करत दिले 'उत्तर'
कामाच्या काँटेटी पेक्षा कामाची कॉलेटी अधिक महत्त्वाची असते.’

तरुणांनी किती तास काम करावं? यावरून सुरू असलेल्या वादात आता सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ‘वर्क लाईल बॅलन्स’संदर्भात केलेल्या स्टेटमेंटला पाठिंबा दिला आहे.
‘रविवारी सुद्धा माझी पत्नी माझ्याकडे बघतच असते’, असं ट्विट पूनावाला यांनी केलं आहे. एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी तरुणांनी आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं
पूनावाला यांनी या संदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘आनंद महिंद्रा आपण बरोबर म्हटलं आहे, माझी बायको देखील विचार करते की मी एक सुंदर व्यक्ती आणि चांगला पती आहे, त्यामुळे रविवारी दिवसभर ती माझ्याकडे पाहात असते.’
पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘कामाच्या काँटेटी पेक्षा कामाची कॉलेटी अधिक महत्त्वाची असते.’