
गेली शस्त्राची लढाई, आली कलमवाली बाई झाली भारतांची ही लोकशाही , आता मिळेल का दौत शाही. !! ध्रृ !!
प्रत्येक राज्याने शस्त्राने राज्य केले !गरीब जन्मआले फुकट मातीत गेले !!अन्याय अत्याचाराची होती हुकूमशाही !!१!!
समतेसाठी शिदनाक तेव्हा ते पेटले !तेव्हा धास्तीचे त्यांचे मन हे फाटले !!तरी पण होती त्यांची ती हताताई !!२!!
उचलली भिमाने लखनीची तलवार. !नको रक्तपात राहावे सुखी जीवन सारं !!भारतावरी राज करे कलमवाली बाई !!३!!
शिल सदाचारी चाले भिमाची लेखनी !असी केली लढाई नाही मारले ना कुणी !!मोरे भिमाच्या पेनामधली मिळेल का शाही !!४!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६. / ७६६६७४९३०३ दि,२२,३,२०२५ वेळ ८,५५ सकाळ