ताज्या बातम्यास्वास्थ/ सेहत

रोज आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

रोज आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

नियमितपणे दररोज आवळा खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
आवळा चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड आवळा अनेकांना आवडतो. पूर्वी शाळेजवळ चिंचा-कैरी विकणाऱ्यांकडे आवळा आवर्जून असायचा. त्यामुळे आपण लहान असताना आवळा हमखास खायचे परंतु आता ते प्रमाण कमी झालं आहे खरं तर आवळ्याचे सेवन प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे आवळ्याचे अनेक फायदे आहेत दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘राणआवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानला आहे चला तर मग आवळ्याचे फायदे जाणून घेऊ.
आवळा हा आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून खूपच फायदेशीर आहे. रोज एक आवळा खाणे गरजेचे आहे सकाळी उपाशीपोटी जर आवळा खाल्ला तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो तसेच आवळ्याचे पदार्थ चघळून खाल्ल्यास पचन संस्थेवर अतिशय चांगला परिणाम होतो. आवळ्यामुळे ऍसिडिटी वाढत नाही पचन संस्था सुधारते भुकेची जाणीव होते अन्नपचनास मदत होते तसेच युरिक ऍसिडची पातळी नियंत्रणात राहते लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींसाठी आवळा हा अतिशय गुणकारी आहे. आवळ्यामध्ये असणार फायबर्स आणि जीवनसत्व कमी शरीरातील रक्तवाहीण्यांचा व्यास वाढून चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो जीवनसत्व कमी त्वचेचे पोषण चांगले होते त्वचा चमकते. भारतीय आयुर्वेदामध्ये सुद्धा आवळ्याला खूप महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे.आवळा सेवन केल्याने रक्तातील चरबी प्रोफाइल सुधारते, ज्यामध्ये कमी ट्रायग्लिसरायड्स आणि एकूण आणि खराब कोलेस्ट्रॉलचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, ते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. बीपी कमी करते आवळा वासोडिलेटर म्हणून काम करतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. त्यामुळे तुम्ही जर आवळ्याचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
या व्यक्तींनी आवळा खाऊ नये
१) आवळ्याचा रस्सा लिव्हर संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांनी आवळा खाणे टाळावे.
२) ज्या व्यक्तींना किडनीशी संबंधित आजार आहेत त्यांनी ज्या आवळ्या खाणं अथवा आवळ्याचा ज्यूस बिना हे हानिकारक ठरू शकते.
३) उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी आवळा फायदेशीर ठरते मात्र ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांना आवळ्यामुळे नुकसान होऊ शकते यामध्ये रक्तदाब कमी करण्याची अधिक क्षमता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button