औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोललं पाहिजे - अजित पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | दि.२४ -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.प्राचार्य बोराडे यांच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी मा.अजित पवार छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. प्राचार्य बोराडे यांच्या विद्यानिकेतन कॉलनी येथील ‘शिवार’ या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व विचारपूस केली.तत्पूर्वी पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं.बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव मधुकरअण्णा मुळे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली बोराडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट प्राचार्य बोराडे यांच्या पत्नी सुलभा बोराडे, कन्या प्रेरणा दळवी, तृप्ती इंगळे, हर्षवर्धन दळवी, पृथ्वी इंगळे, आदित्य जगताप, पुतणे संजय बोराडे, अनिरुद्ध पाटील हे बोराडे यांचे कुटुंबीय तसेच आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.तसेच पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले. ” राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पोलिसांवर जास्त ताण येईल, असं कोणीही बोलू नये”, असं ते म्हणाले.