उन्हाळ्यात माठातले पाणी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे का? तर मग हे नक्की वाचा!
माठातील पाणी नियमित पिल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर |२४ मार्च २०२४ |
सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणू लागला आहे.उन्हाळा म्हटलं की उकाडा आणि घशाला कोरड त्यामध्ये सतत तहान लागणे. त्यातही थंड पाणी प्यावे असे वाटणे हे तर साहजिकच आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हीच परिस्थिती सध्या उन्हाळ्यात पाहायला मिळते.

सध्या बाजारात ठिकठिकाणी मातीचे माठ विक्री करता आले आहेत. जग कितीही पुढे गेले तरीही काही गोष्टी या जुनं ते सोनं असं म्हणून आपण त्याचा वापर करत असतो त्यातील एक गोष्ट म्हणजे मातीचा माठ होय,म्हणून मग अशावेळी घरात माठात पाणी साठवून पाणी प्यायले जाते अनेकदा घरांमध्ये केवळ उन्हाळा आल्यावरच माठाचा वापर केला जातो उन्हाळ्यात आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण बऱ्याच लोकांना फ्रिज मधून थंड केलेले पाणी सहन होत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी पिण्याची सवय होती आणि आता कालांतराने तीच आपली परंपरा बनली परंतु आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का त्याचे काही फायदे आहे का हे जाणून घेऊयात.म्हणून बहुतांश लोक मातीच्या माठाचा उपयोग करतात. पूर्वी रेफ्रिजरेटर किंवा फ्रिज नसताना घरातील माणसं मातीच्या माठाचा उपयोग करीत असे. कारण मातीच्या माठातले पाणी पिण्यासाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि फायदेशीर असते माठातील पाणी नैसर्गिक रित्या थंड झालेल्या त्या पाण्याची चव काय वेगळीच असते.
भारतीय आयुर्वेदामध्ये सुद्धा असे म्हटले गेले आहे की मातीची भांडी अथवा तांब्याची भांडी ही पाणी पिण्यासाठी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे काम करते. मातीमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्याचे मदत मिळते मातीच्या मठातून पाण्याच्या थेंबाच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया होत असते आणि मग पाणी थंड होते. अनेक जण माठाला थंड कपडा गुंडाळतात तसे केल्यास पाणी नैसर्गिक थंड होते आणि याचा शरीराला फायदा होतो म्हणून उन्हाळ्यात मठाचे पिणे योग्य मानले जाते.माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे..!

माठातील पाणी शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरते मातीचा सुगंध त्या पाण्याला असतो त्यामुळे पोट थंड राहते आणि तहान ही भागते तसेच माठातील पाणी नियमित केल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय शरीरातील पचनक्रिया अधिक मजबूत होण्यास मदत मिळते जया बच्चे क्रिया सुधारते तसेच वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते तसेच माठातील पाणी हे शरीरातील साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास साठी खूपच मदत करते पोटासंबंधी असलेले आजार यामुळे बरे होतात पित्त अथवा पोटात मुरळे येत असेल तर ते दूर करण्यासाठी हे पाणी नियमितपणे पिणे योग्य आहे. तसेच मातीच्या माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत कारण मातीमध्ये अनेक मिनरल्स आणि पोषक घटकांचा खजिना असतो.

मातीचे गुणधर्म : माठ बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रो मॅग्नेटिक ऊर्जा असते. मातीमध्ये अल्काइन असते त्यामुळे नैसर्गिकरीत्या मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्काईन होते व त्यामुळे शरीराला उत्तम फायदा पोहोचण्यास मदत होते. मेटाबोलिझम सुधारते मातीचा माठ वापरण्यात चा अजून एक फायदा असतो. त्यामुळे उष्माघाताला आळा बसतो माठातले पाणी प्यावे. तसेच उन्हाळ्यात घशासाठी माठातले पाणी चांगले असते सर्दी खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणारांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा डॉक्टरही सल्ला देतात पण तू माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी कशासाठी चांगले असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला उत्तम फायदा होतोच. शक्यतो माठ हा हाताने बनवलेला असावा त्यामुळे पाणी खूप वेळपर्यंत थंड राहण्यास मदत होते.