शेकडो अनुयायी सहभागी होणार 'बुद्धगया मुक्ती आंदोलन' महामोर्चात
नांदेड येथे २५ मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

द फ्रेम न्यूज
राजकिरण गव्हाणे (जिल्हा प्रतिनिधी)
नांदेड दि. 24 बोधगया येथील महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यासाठी देशभरात ‘महाबोधी विहार मुक्ती आंदोलन’ सुरू आहे, ज्यामध्ये बौद्ध भिक्खू आणि अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
हिंदू लोकांच्या ताब्यात असलेले बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्ध गया है बौद्ध भिकू आणि बौद्ध धर्मी यांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी नांदेड येथे 25 मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील समस्त भिकू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच जिल्ह्यातील विविध आंबेडकरी राजकीय, सामाजिक संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्ध विहार गेली वर्षानुवर्ष हिंदू लोकांच्या ताब्यात आहे.
विशेषतः हिंदू धर्मीयांनी बुद्ध विहाराचे व्यवस्थापनावर ताबा घेऊन मनमानी चालवली असून बुद्धीस्ट टेम्पल ॲक्ट १९४९ नुसार हा ताबा असल्याने बौद्ध धर्मीय भिकू आणि बौद्ध अनुयायीच्या न्याय हक्कावर गदा आणली आहे. त्यामुळे सदर कायदा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतभर बौद्ध भिक्खू आणि अनुयायींनी व्यापक आंदोलन छेडले आहे.
बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात मुक्ती आंदोलन महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवीन मोंढा नांदेड येथे दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायांनी जमाव जमणार आहे.
नवामोंढा मैदान येथून महामोर्चाची सुरुवात होणार असून नियोजित भगवान बुद्ध पुतळा, महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर,कला मंदिर, वजीराबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नांदेड जिल्हाधिकार्यालय असा महामोर्चा चा मार्ग राहणार आहे.
महामोर्चा नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यानंतर महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. नांदेड शहर व परिसरातील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक मोर्चात उपस्थित होणार आहेत.