विनोद साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते उदघाटन
पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा जाहीर सत्कार

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजी नगर | दि.२७ : शिवसेना उपशहर प्रमुख विनोद साबळे यांच्या जुना भावसिंग पुरा येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते बुधवारी (दि.२६) करण्यात आले. यावेळी शिरसाट यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. गायिका पंचशीला भालेराव यांनी विविध गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, अशोक पटवर्धन, रखमाजी जाधव शेख अझर अंबादास म्हस्के, राहुल यल्दी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन लिला सुखदेव अंभोरे, संदीप मानकर यांनी केले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले कि, विनोद साबळे हे तळागळातील कार्यकर्ते आहेत मी स्वतः त्याच्या पाठीशी उभा आहे. आपल्या हातून जे काम करता येईल ते प्रामाणिकपणे करावे, कधीही कुणाला दुखवू नका, जातीभेद करू नका, येणारी माणसे खूप अपेक्षेने तुमच्याकडे येतात. त्यामुळे आपण आपल्या परीने मदतीची भावना त्याच्याविषयी ठेवावी. आपल्याकडे आलेला माणूस कधी निराश होऊन गेला नाही पाहिजे असे आवाहन यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. तर विनोद साबळे म्हणाले कि, विधानसभा निवडणूक काळात मी जुना भावसिंग पुरा वार्डात प्रामाणिकपणे काम केले. या भागातील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे ते सोडवण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी विनोद साबळे यांनी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसेना शाखाप्रमुख शिवहरी वाघमारे, विभागप्रमुख भरत साबळे, गटप्रमुख नितीन वाघुले, योगेश लोखंडे, शरद साबळे, नितीन साळवे, विक्की साबळे, वैभव लोखंडे, धर्मेंद्र साबळे, अविनाश घुले, प्रशांत साबळे, यश साबळे, अविनाश वाघमारे यांनी पुढाकार घेतला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका रुख्मिणीबाई लोखंडे, दादासाहेब लोखंडे, शिवाजी लोखंडे, मुरलीधर लोखंडे, परमेश्वर लोखंडे, ईश्वर वाघमारे, दिलीप वैद्य, प्रदीप चव्हाण, प्रा.भीमराज दुसिंग, संजय अढागळे, मच्छिंद्र कटारे, मनोज कटारे, शिवहरी लोखंडे, श्री परसोडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.