"आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता; तर आज संत झाला असता"- नामदेव शास्त्री महाराज
. नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेची पाठ राखण..!

द फ्रेम न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचे भेट घेतली या भेटीनंतर महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. ते असे म्हणाले की” तास दोन तास आम्ही दोघेही बोललो व्यवस्थित, राजकीय बोललो , सामाजिक बोललो , अध्यात्मिक बोललो, दोन अडीच तास चर्चा झाली आमची.
त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी सगळा समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की; मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आलेला आहे, आणि पक्षाचे सगळे नेते त्याचे बालमित्र आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवता आहेत असे मला वाटत.”
” इतक्या वर्षापासून तो जवळ,आहे गोपीनाथ रावांचा पुतण्या आहे. सगळ्या नेत्यांबरोबर तो राहिलेला आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी पद्धतीची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवताय असं मला वाटतं.”
” पण यांत नुकसान आमच्या संप्रदायाच इतकं झालं, गेल्या ७०० वर्षांत जातिवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी तो उफाळून आनला. संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलय अस मला वाटते. तसेच जातीय सलोखा नष्ट होत चाललेला आहे”
” तसेच भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी केवळ नाही तर भक्कमपणे उभा आहे. दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्यांना त्यांचा शोध चालू आहे मला अजूनही मिळाला एक विचारच वाटते की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली? मीडियाने का नाही दाखवली? कारण अगोदर त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झाली होती त्याची दखल घेन जरूरी आहे. असं मला वाटत. ”
” आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीयेत ना? ज्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या ५३ दिवस झाले तुम्ही जो मिडिया ट्रायल चालवता यात धनंजय मुंडे खंडणी गोळा करून जगणारा माणूस नाहीये, त्याची पार्श्वभूमी ही नाहीये. तसाच समाजावर सुद्धा भयानक परिणाम झालेला आहे या गोष्टींचा, जातिवाद ज्याला माहित नव्हता त्याला आज मीडिया द्वारे जातिवाद माहीत झाला.”म्हणजे जे संत जातीय सलोखा निर्माण करतात त्यांच्यामध्ये सुद्धा आज तेढ निर्माण झालेलं आहे. कारण राजकीय स्वार्थ हा आमच्यासाठी क्षणिक असतो काही काळापुरता राजकीय फायदा असू शकतो तो कायमस्वरूपी नसतो.
कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करण ह्या माणसांना कधी समाधान मिळत नसतं . त्यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा राजकीय व्यक्ती प्रश्न आहे. पण गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो. आणि गड त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे “. असे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री म्हणाले पुढे ते असे म्हणाले की ” आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तर आज संत झाला असता.” असे भगवानगडाचे महंन्त डॉ. नामदेव शास्त्री महाराज म्हणाले आहे.