ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending
महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्विकारला पदभार
राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली

द फ्रेम न्यूज
मुंबई : राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी काल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी शिक्कामोर्तब केले आहे . महाराष्ट्र राज्याचे सातवे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.रत्नागिरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून दिनेश वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. आता ते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.