तंत्रज्ञानताज्या बातम्याराष्ट्रीयविज्ञान
Trending
इस्रोनं जीएसएलव्ही एफ -१५ या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं.
इस्रोनं आज सकाळी ६:२३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ -१५ या १०० व्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं.

द फ्रेम न्यूज नेटवर्क
भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रोनं आज सकाळी ६:२३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ -१५ या १०० व्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून (NVS02) एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस ओ टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला.