ताज्या बातम्याधार्मिकलेख
Trending

पंचशिल पाळा आणि दु:खमुक्त व्हा..!

जगातील सर्व माणव दुःख भोगण्यासाठी सजक आहेत, पण सुख भोगण्यासाठी कमी आहेत

द फ्रेम न्यूज

चोरी व्याभिचार,खुन मोह दुराचार राग लोभ चाहाडी चुघली ह्या सर्व गोष्टी वैभव आणि सुख शांन शोक घडविण्यारे मोह फासे आहेत, माणवी जिवनात हे निद्रेमध्ये सुध्दा विचलित करुण सोडतात, यासाठी त्यांचे मन क्षणोक्षणी मोहफाश्याकडे घेऊन जातं असते.

एकदा चार चोर एका नाव्हाच्या घरी गेले होते, नाव्ही टर्रर्र गाड झोपेत होता, त्या चोराने भिंत फोडून घरात शिरला आणि नाव्हाच्या गळ्याला चाकू लावला, म्हणाला चाब्या दे, तसा नाव्ही झोपेत गागरला, तो म्हणतो कसा, माझ्या घरातले सर्व न्या पण माझं पृथ्वीफलाटंन नेवू नका, तेव्हा चोराला वाटले की हा दागीना लय भारी असेल,चोरांने विचारले तो कुठे आहे, नाव्ही म्हणतो तो मी आजपावतो कुणाला सांगीतलेले नाही, पण तुमच्या ह्या शस्त्रांच्या धाका पुढे मला सांगावे लागते, म्हणुन मी सांगतो, चोराने विचारले ते कुठे ठेवला आहे , मी माझ्या पोराला बायकोला सुध्दा कळु दिला नाही.

माझ्या धोपट्टीत ठेवला आहे, तेव्हा चाराने दुसरे कांहीच घेऊन न जाता ती धोपट्टीच घेऊन पसार झाले, दुर शेतात जाऊन पाहात होते ती धोपट्टी इचकुन पाहात असताना ,तर काहीच कुणाला मेळ लागत नव्हता, घरांत चोरी झाली, ह्यांच्या घरच्या लोकांनी बोंब केली, पण घरामधले काहीच गेले नाही, एक दिवस त्या चोरामधला एक चोर शेव्हिंग करण्यासाठी नाव्हाकडं आला, आणि म्हणाला काय नाव्ही बुवा तुमच्या घरी मोठी चोरी झाली असं माझ्या कानावर आले.

नाव्ही म्हणतो, हो ,मग काय चोराने नेले, त्यांनी माझी धोपट्टी घेऊन गेले, पण त्यांना काहीच सापडले नसेल, त्यांनी माझ्या घरी चोरी करु नये,हा त्या मधला भाग, त्यांना मी म्हणालो सर्व न्या पण माझं पृर्थवीफलाटंन नेवू नका, बरं पृर्थविपलाटंन म्हणजे नक्की काय असतं, नाव्ही म्हणतो,आहो ते हातभार वसतरा फिरवायचे कातडं असतं.

तेव्हा त्या चोरट्याला कळाले की आपण मोठे होण्याचे जी आशा करत होतो तो मार्ग निर्थक आहे, जसे आपन कमावलेले धन असतं ते जर कुणी उचलून नेत असेल तर आपला ही जीव तुटतो का नाही,मग आपण दुसऱ्याचे धन चोरुन घेवुन येतो त्यांना ही असंच वाटतं असेल ना ?

चार चोर आणि नाव्ही हे सर्वजन एके दिवशी तथागत गौतम बुद्धांचे प्रवचन होते,  तिथे तथागत गौतम बुद्धांकडे गेले होते, तिथे तथागत गौतम बुद्ध आपल्या प्रवचनात पंचशिलेचे म्हत्व पाठवुन देत असताना, हे पांच शिल  माणसाच्या भवताल फिरतं असतात,की हा माणव कोणत्या ना कोणत्या फाश्यात पाडण्यासाठी ह्यांवर ते सजक असतात.

जेव्हा आपली नितीमत्ता थोड्याशा कारणावरुन ढासाळत गेली, तेव्हा तो फास आपल्या जिवानाची आहूतीचे कारणं ठरते, मग आपण जेव्हा त्या शिलाच्या कार्याचे पथे सांभाळनार नाही तोपर्यंत दुःख हे आपल्या जिवनभर अवताल भवतालाच फिरत असतात.

पंचशिल आपल्या कार्य शोधून तावून सुलाखून पाहातो तेव्हा कुठे सुखाचे चाहूल लागत आहे, या जगातील सर्व माणव दुःख भोगण्यासाठी सजक आहेत, पण सुख भोगण्यासाठी जन कमी आहेत, बुद्ध म्हणतात प्रत्येकाला सुख पाहिजे, पण दुःखाचा सांभाळ फक्त मिच केला आहे, वयाच्या आठाविस वर्षा पासून दुःखाची उत्पत्ती आणि त्यांचा निवारण हाच मी मार्ग शोधत गेलो, तेव्हा कुठे मला ज्ञानाचे भांडार  मिळाले, या जगावर  दुःख सांभाळणारे जगात तथागत गौतम बुद्ध होय, म्हणुन त्याने तपश्र्चर्यामधुन मिळविलेले ज्ञान हे जगाच्या इतिहासात नोंद केल्या गेली, हे प्रवचन चोराने श्रवण करुन ते धम्म दिक्षा घेण्यासाठी उच्छू झाले आणि आपले पंचशिलेच्या तत्वानी सुखमय जिवन प्रवास करु लागले.

लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक,गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२२८५०६४४६ दि,१८,१,२०२५ वेळ १० ४५ रात्री 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button