ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रलेख
Trending
जनस्थान पुरस्कार ' ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर
१ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

द फ्रेम न्यूज
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर, कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.१ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिक इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.