आज भीम सैनिकांचा लाॅंग मार्च बौध्द लेणी येथे मुक्कामी
धम्मभूमी बौद्ध लेणी येथे अभिवादन सभा होऊन लॉन्ग मार्च मुक्कामी राहणार आहे

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजी नगर | दि.२७/०१/२०२५
परभणी येथून मुंबई मंत्रालयावर जाण्यासाठी भीमसैनिकांचा लॉंग मार्च आज छत्रपती संभाजी नगर येथे पोहोचला आहे. काल २६ जानेवारी रोजी सायंकाळी केंब्रिज चौकात मुक्कामी होता. शहर नजीक असलेले केंब्रिज चौकातील चंपावती लाॅन येथे मुक्कामी राहिला असून या ठिकाणी त्यांच्या निवासी व भोजनाची व्यवस्था धम्मज्योत बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष विशाल इंगळे व तमाम भीमसैनिकांकडून करण्यात आली होती.

आज दि २७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता केंब्रिज चौकातून ह्या लॉंग मार्चने शहरात प्रवेश केला. चौका चौकामध्ये परभणी वरून आलेल्या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेल्या भीमसैनिकांचे चौका चौकात स्वागत करण्यात आले. त्यांना एनर्जी ड्रिंक, फळ,आणि पाण्याच्या बाटल्याचं वाटप करण्यात आले

हा लॉंग मार्च ” जयभीम ,जय संविधान, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रत्येक चौका चौकातून मार्गस्थ होत पुढे चालला होता.
जालना रोडवर चिकलठाणा, धुत चौक, संजय नगर, मुकुंदवाडी ठिकठिकाणी थांबत क्रांती चौक येथे शहिदांना अभिवादन करून पुढे शिल्ल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक मार्गे भटकळ गेट, मिल कॉर्नर, मिलिंद हायस्कूल चौक, विद्यापीठ गेट येथे अभिवादन करून पुढे विद्यापीठ परिसरातून धम्मभूमी बौद्ध लेणी येथे अभिवादन सभा होऊन लॉन्ग मार्च मुक्कामी राहणार आहे.

बौद्ध लेणी येथे पूज्य बनते विशुद्धानंद बोधि माथेरान व भिक्खू संघाच्या वतीने लॉंग मार्चमध्ये सहभागी असलेल्या भीमसैनिकांचा निवासी व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे लॉंग मार्च दि २८ रोजी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ होईल.