छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

२५ वर्षानंतर जमला शाळेतील आठवणींचा मळा

ज्ञानदीप विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा उत्साहात

छत्रपती संभाजी नगर | दि. २७ : प्रकाशनगर, सिडको एन-२, येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या १९९९ -२००० वर्षाच्या इयत्ता दहावीतील वर्ग मित्र मैत्रिणी तब्बल २५ वर्षानंतर रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा रविवारी (दि.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेतील तेव्हाचे प्रत्येक क्षण आठवत शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

प्रतिकूल परिस्थिती शाळेत शिक्षण घेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले करिअर घडवले. कोणतीही शिकवणी नसताना शाळेत शिक्षकांनी रात्रीचे वर्ग घेऊन प्रचंड मेहनतीने प्रत्येकाला शिकवून दहावी उत्तीर्ण केले. त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप विद्यालयाच्या १९९९ -२००० वर्षाच्या इयत्ता दहावीतील वर्ग मित्र मैत्रिणी तब्बल २५ वर्षानंतर रौप्य महोत्सवी स्नेहमेळाव्यात आपापल्या भावना व्यक्त केल्या. स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक पवन भिसे, सूत्रसंचालन सचिन अंभोरे यांनी केले. शाळेत एकत्र बसून मधल्या सुट्टीत खाल्लेला डब्बा, अभ्यास न केल्याने शिक्षकांकडून मिळालेली शिक्षा, आणि यामुळे परिस्थितीशी जुळवत मिळालेले यश विद्यार्थ्यांनी डोळ्यांच्या कडा पाणावत सांगितले. सर्वसामान्य कामगार, कष्टकऱ्यांची मुले-मुली शिकवून ज्ञानदीप विद्यालयातील प्रत्येक शिक्षकांनी सर्व विद्यार्थी सक्षम बनवली. याचा सार्थ अभिमान यावेळी वर्गमित्र-मैत्रिणीनी व्यक्त केला. शाळेत दहावीत असताना मुलांना शिकवणारे जोगदंड सर यांनी लेझीम तसेच ढोल पथकातून विविध खेळाची गोडी कशी लावली याबाबत आठवणी सांगितल्या. तर रमेश आकडे म्हणाले कि, १९९९-२००० या वर्षात असणाऱ्या दहावी च्या विद्यार्थ्यांनी आपले विश्व शून्यातून उभे केले. आज विविध पदावर ते कार्यरत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. शाळेत एमसीसी च्या माध्यमातून विद्यार्थ्याला चांगली शिस्त लावता आली. त्यामुळे आज प्रत्येक जन इतरांना प्रेरणा देणारे कर्तुत्व सिद्ध करत आहेत. प्रत्येकाची प्रगती होवो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून आजच्या पिढीतील गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी सेवा घडो असे आवाहन त्यांनी यावेळी माजी विद्यार्थ्यांना केले.तर गणित आणि विज्ञान शिकवणारे विनायक पवार म्हणाले कि, विद्यार्थ्यांना गणित शिकवताना त्यांच्यावर संस्काराचे गणित जुळवता आले. विज्ञान शिकवताना त्यांना आयुष्याचा दृष्टीकोन दिला आणि विद्यार्थ्यानी तो आपल्या भावी आयुष्यासाठी आमलात आणला याचे समाधान मला वाटते. तर श्यामसुंदर भालेराव यांनी त्यावेळी मराठी कविता शिकवतांना वाचन आणि साहित्याची गोडी कशी लावली हे सांगितले. तर कला शिक्षक कैलास झिने यांनी अशी पाखरे येती हि कविता सादर करत शाळेतील चित्रकलाबाबत आठवणी व्यक्त केल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि कलात्मक विचारांचे रंग भरता आले याबाबत समाधान व्यक्त केले तर कैलास गांगुर्डे यांनी शाळेतील स्नेहसंमेलनात विविध नृत्याची कशी तयारी केली जात होती याबाबाबत आठवणी सांगितल्या.

यावेळी १९९९-२००० इयत्ता दहावीतील वर्गमित्र-मैत्रिणींच्या वतीने व्ही. टी.जोगदंड, रमेश आकडे, विनायक पवार, श्रीमती योगिता पाटील,व्ही. बी.राजपूत, के.एम.पगारे, श्यामसुंदर भालेराव,डी. व्ही. इंगळे, कैलास गांगुर्डे, श्रीमती एल.के रोठे, श्रीमती एस.ई.पंचोळे, पंढरीनाथ खंदारे, के.आर .गोस्वामी, ए .ए .ढगे, आर .टी. बनकर, व्ही. सि.हिवाळे, एस.एस.मगरे, डी.एस.पगारे, कलाशिक्षक कैलास झिने, डी.पी.महाजन,आर. के .चव्हाण ए .के. कोल्हे, एस .के .निकम, पि.डी.पिवळ, एन .व्ही. भालेराव,श्रीमती डि.ए घागरे, श्रीमती सि.एस. नायर, श्रीमती.एस.ए.जाधव, श्रीमती पि.एस. हिवराळे, सेवक श्री पिवळे, श्री कोल्हे या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी १९९९-२००० इयत्ता दहावीतील अजय शिंदे, ⁠विनोद साळुंके, हेमंत पाटील, शिवाजी देशमुख, प्रणय शेटे, दिगंबर चव्हाण, रामेश्वर सोनवने, सचिन शेवाळे, राहुल निकम, विजय वाडेकर, दीपक भाले, विजय बचके, योगेश नरवडे, विजय नरवडे, संदीप बर्फे ,विकास बनकर, प्रविण घाटुळ, प्रियदर्शनी सुडके, स्वाती काळवणे, आशा मोकळे, वैशाली खोत, विजया सोनवणे, रत्नमाला बोराडे, उज्वला भारती, अश्विनी गडकर, अश्विनी यादव, अनिता वाघ, मीना खरात, संज्ञा वाहुळ, जया मोकळे, सविता चाबुकस्वार, योगिता मेटे, ⁠अंबादास कोलसकर, सचिन सोनवणे, ⁠कविता बागुल,⁠ लंका मेटे, ⁠प्रणाली भालेराव, ⁠नागेश राऊत, ⁠आशिष खापरे, कौशल्या ठोंबरे, संगीता शिंदे, संदीप बर्फे, राहुल बनकर, यांची उपस्थिती होती. आभार स्वाती काळवणे यांनी मानले.

फुल हार रांगोळ्यांनी विद्यार्थ्यांचे केले स्वागत

प्रारंभी शाळेच्या ग्राउंड वर सर्व १९९९-२००० इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकडून शिक्षक जोगदंड यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना, प्रतिज्ञा तसेच राष्ट्रगीत घेऊन वर्ग प्रवेश केला. शाळेच्या वतीने आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे फुल हार रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले. तेव्हाचे वर्गशिक्षक विनायक पवार यांनी सर्वांची हजेरी घेऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना केल्या. पुन्हा वर्गातील शिकवणीचा तास आणि ते दिवस आठवून स्नेहमेळाव्यात प्रत्येकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button