येणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणते चित्रपट प्रदर्शित होणार पहा..!
' व्हॅलेंटाईन डे ' च्या निमित्ताने कोण कोणते सिनेमे येणार

फेब्रुवारी महिना हा फक्त प्रेम करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. कारण ह्या महिन्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नवीन कपल्स विकेंड साजरा करण्या करिता किंवा आपल्या मित्र आणि मैत्रिणींना खुष करण्यासाठी काहीतरी नवीन प्लानिंग करत असतात.कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला गुलाब किंवा रिंग देऊन प्रपोज करतात, तर कोणी पत्नी किंवा नवऱ्यासाठी कॅन्डल लाईट डिनरचा बेत करतं. जर तुम्हाला हा आठवडा तुमच्या पार्टनरसोबत साजरा करायचा असेल तर तुम्ही चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहू शकता.’ व्हॅलेंटाईन डे ‘च्या निमित्ताने कोण कोणते सिनेमे येणार आहेत. पहा
लवयापा (Loveyapa) : अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांचा रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट ‘लवयापा’ ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘लवयापा’ हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’ चा हिंदी रिमेक आहे.
धूम धाम (Dhoom Dhaam): यामी गौतम आणि प्रतीक गांधीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. या रोमकॉम चित्रपटातील यामी आणि प्रतीक गांधीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी प्रदर्शित होणार आहे.
छावा (Chhaava) : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय.
बैडएस रवि कुमार (Badass Ravi Kumar) : गायक अभिनेता हिमेश रेशमिया Badass Ravi Kumar या चित्रपटात थेट मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक बडे कलाकार आहेत. येत्या ७ फ्रेब्रुवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रर्शित होणार आहे.
नखरेवाली (Nakhrewali) : ‘नखरेवाली’ हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटात नीता सतनानी आणि अंश दुग्गल हे पाहायला मिळतील. ‘नखरेवाली’ चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय आहेत, ज्यांनी ‘तनु वेड्स मनू’चे दिग्दर्शन केलं होतं.तर हे ५ चित्रपट तुमच्या भेटीला म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ वीक मध्ये येणार आहेत. तर आपला विकेंड आनंदी, उत्साही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत घालवायचा असेल तर हे चित्रपट तुमच्याकरिता येत आहेत. हे सिनेमे चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.