बीएनएन महाविद्यालयात ''वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा वाचन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला
"माझे आवडते पुस्तक" कार्यक्रमाचे आयोजन केले होते

भिवंडी : दि. १४ पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी.एन.एन. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा वाचन पंधरवडा 1 जानेवारी ते १५जानेवारी २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला. निरलॉन ग्रंथालय विभागांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, लॉ कॉलेज ग्रंथालय, एमबीए कॉलेज ग्रंथालय व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकाच्या आदेशानुसार हा पंधरवाडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत “माझे आवडते पुस्तक” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नाेदवून त्यांच्या आवडीच्या ग्रंथांचे वाचन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रंथपाल माधव मुंडे यांनी केली ते या वेळी म्हणाले की, संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय जाधव, संस्थेचे कार्याध्यक्ष बी.डी. काळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य व ग्रंथपाल समितीच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंधरवडा यशस्वी झाला. त्यामळे या सर्वांचे आभार ग्रंथपाल माधव मुंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती घनगाव यांनी केले, कार्यक्रमासाठी लॉ कॉलेजच्या प्राचार्या पठाण मँडम,माजी ग्रंथपाल डॉ. नंदा बारसगळे,तसेच ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. राहुल रंगारी, मराठी विभागाच्या डॉ.अलका कदम, मास मीडिया विभागाचे प्रा. अंकुश चव्हाण, प्रा. गणेश पानझाडे, लॉ कॉलेज ग्रंथपाल प्रिया पाटील, सहाय्यक ग्रंथपाल पुजा पाटील आणि ग्रंथालयाचा सर्व स्टाफ व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. अलका कदम यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.