पंचायत से पार्लमेंट तक भाजपला जिंकवायचे आहे"-अमित शहा
विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली गाडून टाकले.


शिर्डी : काल शिर्डीत आयोजित भाजपच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाष्य केले आहे. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली गाडून टाकले.तसेच महाराष्ट्रातील विधानसभे च्या निवडणूक निकाल यांनी राज्यातील असतील राजकारणाला ही मूठमाती दिली आणि भाजप महायुतीला प्रचंड बहुमत देऊन विरोधकांची सत्तेत येण्याची स्वप्ने धुळीस मिळवली. असे भाष्य केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी रविवारी भाजपचे एक दिवसाच्या अधिवेशनाचा समारोप अमित शहा यांच्या भाषणाने झाला. अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने हे स्पष्ट केले आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि अजित पवारांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाताच्या राजकारणाला नाकारले आहे.”विजयासाठी पूर्ण ताकत लावा…” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावा विरोधकांना एकही जागा मिळता कामा नये पंचायत से पार्लमेंट तक भाजपलाच जिंकायचे आहे याचा निर्धार करा ” असे ते म्हणाले.”शरद पवार सहकार क्षेत्रातील बडे नेते केंद्रात मंत्री होते पण ते शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू शकले नाहीत जे दावे करत होते त्यांचा सफाई झाला.” असेही आमित शहा म्हणाले.”मा.नरेंद्र मोदींच्या विकासाच्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे”, असं अमित शाह म्हणाले.” मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपेल”, असं देखील अमित शाह म्हणाले. ग्रामपंचायत ते पार्लमेंट पर्यंत तुम्ही “भाजप-एनडीएला विजय मिळवून दिला पाहिजे. या वर्षी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहेत, तिथं सर्व जागांवर भगवा फडकवायचा आहे”, असे अमित शाह म्हणाले.”दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये नसले पश्चिम बंगालमध्ये तो अमोल आणि काँग्रेसमध्ये सोबत नाहीये. बिहारमध्ये लालूप्रसाद काँग्रेस पासून वेगळे होत आहेत महाराष्ट्रातही त्यांचे बिनसने सुरू झाले आहे इंडिया गाडीचे तीन तेरा वाजले सुरू झाले आहे” असा मी शहा म्हणाले.”महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच या निवडणुकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणावर मोहर उमटवली हिंदुत्वाचा विजय झाला” असेही ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शहांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, “लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले होते मग अमित शहा यांनी हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिले की पराभवानंतरही विजय पुढे आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने हा विजय मिळवला आणि मी अमित शहाजींचा आभारी आहे.”रविवारी भाजपच्या एक दिवसाच्या अधिवेशनाचा समारोप अमित शहा यांच्या भाषणांनी झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे ,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सचिव पंकजा मुंडे, शिवप्रकाश, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अशीष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, संमेलनाचे आयोजक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, यांच्यासह मंत्री जेष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.