कांग्रेसदिल्लीराजकीयराष्ट्रीयराहुल गांधी
Trending

दिल्लीत कांग्रेसच नवीन मुख्यालय

४५ वर्षानंतर काँग्रेसने आपलं नवीन मुख्यालय बनवलं

४५ वर्षानंतर काँग्रेसने आपलं नवीन मुख्यालय बनवलं

दिल्लीत काँग्रेसच्या नवं राष्ट्रीय मुख्यालय ४५ वर्षानंतर काँग्रेसने आपलं नवीन मुख्यालय बनवले आहे. पूर्वी २४ अकबर रोड असा पत्ता होता. इंदिरा गांधी भवन, ९ एक कोटला रोड असा पत्ता असणार आहे.पाच मजली भव्य दिव्य इमारत आहे. माझी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झालं होतं. आणि आता १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तळ मजला असलेल्या पाच मजल्याच्या तळाशी तळघरात पार्किंगची व्यवस्था आहे. यात रिसेप्शन आणि कॅन्टीन आणि यासारख्या एकाच कार्यालयात सर्व  आधुनिक सुविधा असलेले हे काँग्रेसचे मुख्यालय आहे.   कार्यकर्त्यां करिता स्वतंत्र माध्यम कक्ष आणि सभागृह बनवण्यात आले आहे.  याशिवाय एक विशेष संग्रहालय बांधण्यात आले असून त्यात काँग्रेसच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा तपशील असून काँग्रेसचे मुख्यालय उद्घाटनासाठी  सज्ज आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे की दोन्ही मोठ्या पक्षांचे म्हणजे भाजप आणि काँग्रेसचे मुख्यालय जवळ – जवळ आहेत. म्हणजे या ठिकाणापासून भाजपचे मुख्यालय एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button