ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
सिने आणि टिव्ही असोशिएशनचे पदाधिकाऱ्यांनी घेतली कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची घेतली भेट
चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत

द फ्रेम न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट उद्योगामध्ये सर्व स्तरातील काम करणारे कलाकार,सह-कलाकार,नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्या संदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने आणि टिव्ही असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी आज मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे सुद्धा उपस्थित होते.