मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस..!
निवडणूक आयोगाने ६ नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत - उच्च न्यायालय

द फ्रेम न्यूज
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भात ही नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभेत सायंकाळी ६ :०० वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसं झालं यावरून आक्षेप घेत याचिका दाखल झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद होता. निवडणूक आयोगाने ६ नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत? अस उच्च न्यायालयाने म्हटल आहे! आता निवडणूक आयोग आणि राज्य शासनाकडून काय प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करण्यात येत आहे याकडे पाहावं लागणार आहे.

या संदर्भात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲड.प्रकाश आंबेडकर म्हणाले ” रिटर्निंग ऑफिसर्सने ६ नंतरच्या मतदानाच्या वेळेमध्ये नियमावली पाळी की नाही पाळली हा त्यांच्यातला महत्त्वाचा भाग होता.”
” सहानंतर मतदान करून घ्यायचे असेल तर टोकन वाटायचे असतात. आणि टोकन वाटले किंवा नाही वाटले हा त्यातला इशू आहे.”
” इलेक्शन कमिशनला मी पत्र लिहिलं होतं यासंदर्भात त्यांच्याकडून उत्तर असं आले आहे की; की त्या संदर्भातला कुठलाही डेटा आमच्याकडे उपलब्ध नाही. आणि ते दोन मुद्दे आम्ही उच्च न्यायालय समोर मांडले आहेत.”
” तिसरा मुद्दा जो आहे की ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवसाची एकत्रच टॅली झाली पाहिजे ती टी टॅली झाली नाही. इलेक्शन कमिशन डायरेक्शन आहेत इथे इलेक्शन कमिशनला रेफर करायचं इलेक्शन कमिशन त्यावर मार्गदर्शन तत्व देईल.”
“त्या प्रमाणात असणार निवडणूक जाहीर जाहीर करतात महाराष्ट्राच्या बऱ्याच मतदारसंघात मध्ये पोल बूथ आणि काउंटर बूथ जुळत नाही यामुळे न विचारता जर त्यांनी असणार मतदान केलं असेल किंवा इलेक्शन जाहीर केला असेल याचे स्टेटस काय हेही आम्ही कोर्टाला ठरवण्याच सांगितलं आहे.”
असं ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आहे पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.