१ फेब्रुवारीपासून बसं, ऑटो, टॅक्सी भाडं महाग होणार
राज्यात एसटी बसचा प्रवास महागला

द फ्रेम न्यूज
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे आता महाग झाले आहे. एसटी बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. यामुळे आता लालपरीचा प्रवास महाग झाला आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.१४.९५ टक्के एसटी तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. एसटी बस तिकीट दरवाढी संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे प्रवास मागणार आहे रिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांवरून २६ रूपये आणि २८ रुपयावरून ३१ रुपये होणार आहे.
१ फेब्रुवारीपासून लागू होणार नवे दरमुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाने प्रवासी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ने मांडला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे १ फेब्रुवारीपासून ऑटो – टॅक्सी भाडं महाग होणार आहे.बसच्या दरातही १५ टक्क्यांची वाढदरम्यान, विधानसभेआधी महायुती सरकारने महिलांना निम्म्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिली होती.
मात्र निवडणुकीनंतर बसच्या भाडे दरात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय विधानसभा निवडणुकीनंतर मात्र मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. मुंबईत बस दरवाढ नंतर आता टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्याही दरात वाढ झाली आहे.