

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पोलिसांकडून पाळत ठेवल्या जात आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या राहत्या घरी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेत होते. तिथे सर्व पत्रकार ही होते मात्र तिथे एक व्यक्ती मोबाईल मध्ये चित्रण करत असल्याचा संशय आला त्या व्यक्तीस आव्हाडांनी आणि पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर त्याने सांगितले की मी एसबीच्या (विशेष शाखा) पोलीस कर्मचारी आहे. असे त्या व्यक्तीने म्हटले. त्या पोलिसाला जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न विचारले ते म्हणाले की “आपल्याला काय अधिकार आहे. कुणाच्या घरी जायचा..?, तुम्हाला तुमच्या कोणत्या अधिकाऱ्याने पाठवलं..? “अशी पाळत आमच्यावर ठेवण्यापेक्षा त्या वाल्मिक कराड वर ठेवा”?. “अशी पाळत वाल्मीक कराडवर पोलिसांनी ठेवली असती तर तो लवकर सापडला असता..!” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.पुढे संताप व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांनी विशेष शाखेच्या पोलिसाला अनेक प्रश्न केले. जितेंद्र आव्हाड यांनी असे म्हटले की ” तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला.?” ” माझं घर हे माझं खाजगी आयुष्य आहे.” माझ्या घरात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही ?” हा माझा वैयक्तिक अधिकार आहे.” “तुम्ही कसे आलात ?”असे अनेक सवाल जितेंद्र आव्हाड आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला केले.यावर त्या कर्मचाऱ्यानी उत्तर दिले की “मला माझ्या वरिष्ठांनी मला पाठवलं आहे” यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की,”मग वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही उद्या दरोडा टाकणार का? “माझ्या घरात चोरी झाली असा मी आळ तुमच्यावर घेतला तर चालेल का? तुम्ही काय करत आहात तुम्हाला समजतं का? “तुम्ही चित्रीकरण करण्या अगोदर मला विचारायचं असतं ना, आम्हालाही खाजगी आयुष्य आहे की नाही?” असे अनेक संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले.ते म्हणाले “हे सर्व धक्कादायक आहे .कारण तो व्यक्ती सरळ माझ्या घरात येतो ,म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचे की नाही? हा सर्व प्रकार माध्यमांच्या समोर घडला होता. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनीही त्या पोलीस कर्मचाऱ्यास विचारणा केली असता ” मला वरिष्ठांनी पाठवल आहे असं त्याने म्हटलं आहे.