छत्रपती संभाजीनगरतंत्रज्ञानमहाराष्ट्रविज्ञान

'आपली महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणारा पती हवा,' असे मुलींनी म्हणायला हवे - गीतांजली किर्लोस्कर

छत्रपती संभाजीनगर : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर ( सीएमआयए) च्या वतीने आयोजित प्रेरिता संवाद कार्यक्रमात किर्लोस्कर सिस्टमच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका गीतांजली किर्लोस्कर यांनी त्यांचे मत मांडले आहे.

गीतांजली किर्लोस्कर यांनी टोयोटा उद्योग समूहात केलेल्या कामाचा २८ वर्षाचा अनुभवही त्यांनी यावेळी शहरातील उद्योजकांसमोर सांगितला. जगप्रसिद्ध टोयोटा कंपनी मुळे छत्रपती संभाजीनगर शहरात भविष्यात अमुलाग्रह बदल होतील असेही त्या म्हणाल्या

तसेच टोयोटा किर्लोस्कर ने संभाजीनगर मध्ये मोठी गुंतवणूक केली त्यामुळे त्या प्रथमच शहरात आल्या होत्या. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (सीएमआयएम) च्या वतीने त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. त्याबरोबरच त्यांनी जपानी सोबत त्यांच्या कामाचे अनुभव सुद्धा लोकांसमोर मांडले त्या म्हणाल्या की जापानी लोक दूरदृष्टी विश्वास आदर आणि विनय या मुल्यांवर जापानी लोकांचा भर असतो, असं हि त्या म्हणाल्या. पुढे ते असे म्हणाले की छत्रपती संभाजी नगर वासियांनी या मूल्यांवर काम केल्यास भविष्यकाळात या उद्योगासोबत शहरात काही सामाजिक विकास वेगाने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

• शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत आशिया खंडाच्या विकासात केंद्र बिंदू ठरेल.

• शहरवासीयांनी या संधीचे सोने करावे.

• जागतिक पातळीवर भारतीयांना मोठी सुवर्णसंधी उत्पादकता आणि नावीन्यता वाढवण्याची अत्यंत गरज.

•औद्योगिक संस्थे बरोबर लघु मध्यम उद्योगा करिता आवश्यक कौशल्य विकसित करावेलागेल

•.नवउद्योजकांनी उद्योगात अपयश आल्याने खचून जाऊ नये, तर अपयश पचवता आले पाहिजे.

•आपली क्षमता ओळखून नव्या कल्पनांना वाव द्या.

• टोयोटा कंपनीच्या माध्यमातून शहराला मिळालेल्या संधीचे सोने करा.

•नैतिक, सांस्कृतिक, मूल्य, एनव्हारर्मेंटल,सोशल,गव्हर्नन्स ( ईएसजी) मानांकने पाळा.जागतिक बाजारपेठ ओळखून उत्पादन करा, नवनवीन कार्यपद्धती विकसित करा.

• स्वतःच्या मर्यादा ओळखा.नेहमी सकारात्मकता बाळगा, सदैव आनंदी रहा यश तुमचेच आहे

.जपानी लोकांच्या यशामागील तत्व

१) जपानी लोक दीर्घकालीन नात्यांमध्ये गुंतवणूक करतात.

२) जपानी लोकांना विश्वास, पारदर्शकता, आणि प्रामाणिकपणा त्यांना खूप आवडतो.

३) लोकांशी नेहमी आदराने वागतात, वेळेलाही फार महत्व देतात.जपानी लोक उच्चपदस्त व्यक्ती सुद्धा स्वतःचा विनय ढळू देत नाही हे त्यांच्या वर्तनातून दिसते.

टोयोटा उद्योग शहरात आणण्यात सीएमआय चे पदाधिकारी आणि मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड संदिपान भुमरे यांचा मोलाचा वाटा असल्याचेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button