महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला

छत्रपती संभाजी नगर | दि. ८ :’जागतिक महिला’ दिनाच्या निमित्ताने समाजातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर च्या वतीने शनिवारी (दि.८) मान्यवरांच्या उपस्थितीत आय एम ए हॉल, शनी मंदिर जवळ छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी पूजा वानखेडे, वरिष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, पत्रकार डॉ. आरती श्यामल जोशी, लेखिका व समाजसेविका जयश्री एस. भगत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष छबुराव ताके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ज्ञानेश्वर खंदारे, तर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन लिला सुखदेव अंभोरे व कर्तृत्ववान महिलांचा परिचय प्राची प्रशांत सूर्यतळे यांनी केले. यावेळी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर, मनोज पाटणी, प्रशांत सूर्यतळे, सुजित ताजने , महेंद्र डेंगळे, विशाल सोनवणे, यांनी पुढाकार घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष उमेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यांचा झाला सन्मान.!तेजश्री दिलीप पाचपुते, निर्मला निंभोरे, प्रविणा ताराचंद यादव, लता जाधव, डॉ. अर्चना चंद्रकांत गणवीर, ॲड. स्मिता प्रल्हाद जोंधळे, निता गंगावणे, सरला राजेश सदावर्ते, भाग्यश्री अण्णासाहेब जगताप, विद्या गावंडे, दिव्या रमेश इंगळे, डॉ. सुषमा उन्मेष शिंदे, पृथा वीर, जयश्री एस. भगत, उज्ज्वला सुभाष साळुंखे, योगेश्वरी बाबुलाल बोहरे, डॉ. वर्षाराणी इंदानी-खोचे, अनु गंगाराम चव्हाण, कविता वाघ घुगे, पूजा वानखेडे, योगिता कृष्णा शिंदे, मनिषा वाघमारे, अनिता ज्ञानदेव फसाटे, सविता रत्नाकर कुलकर्णी,कल्पना इंद्रसिंग राजपूत, प्रा. भारती भांडेकर विश्वास. प्रमिला मुसळे, शुभलक्ष्मी महिला बचत गट शिवाजीनगर, उमा फुलारी, सीमा पाटील, चारुशीला, पत्रकार कल्याणी नागोरे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.