मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा HRA बंद करा -प्रशांत बंब


आज छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या कार्यालयात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी त्यांना शिक्षकांचा HRA बंद बद्दल विचारले असता ते असे म्हणाले.”माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद श्री मीना साहेब यांच्याकडे माझी बैठक झाली. त्या बाबतीमध्ये आणि गेल्या मी सांगितल्यापासून सप्टेंबर २०२२ पासून माझ्या मतदारसंघांमध्ये सगळ्यांचा HRA बंद आहे. म्हणजे ते त्यांनी ऑफ डाउन करन हे त्यांना कायदेशीर नव्हतं त्यांनी त्यांच्यावर आत्तापर्यंत शिस्तभंगाची कार्यवाही करून त्या शिक्षकांना कमी करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या शिक्षकांची भरती करायला पाहिजे होती.शासनाकडे प्रस्ताव पाठवून पण त्यांनी केलेलं नाहीये. ते त्यांनी मान्य केलं कालच्या बैठकीमध्ये आणि त्यांनी लागलीच निर्णय घेतला की जे शिक्षक आता गावात राहत नाहीयेत मुख्यालय जे एम सी एस आर आणि कायद्याप्रमाणे राहणं बंधनकारक्याचे कारण शिक्षक महोदय फक्त १० ते ४ येऊन शिकवावं हे अपेक्षित नाहीये त्यांना गावात राहून सगळ्यांना त्याला म्हणतो आपण संस्कार दिले पाहिजे गावात शिक्षक राहिल्यामुळे वेगवेगळे मुक्त होतात लोक हे ते करत नाहीत म्हणून त्यांच्यावर खडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना जे काय दिलेला आहे मुख्यालय राहण्याचा कायदा तो त्यांनी पाळलेला नाही. आणि याचा सगळा हेतू आहेत दर्जेदार शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण दिलं नाही त्याचा क्रायटेरिया आहे. पण त्यानी ते दिलं नाही हे प्रूफ झालेलं आहे त्याकरता सन्माननीय एज्युकेशन ऑफिसर मॅडम आणि सी ओ साहेब यांनी मला शब्द दिला त्याला की आम्ही ताबडतोब कारवाई सुरू करतो आणि त्यांच्यावर शिस्त भंगापासून जी कारवाई करायला पाहिजे ते आम्ही करणार.”
पत्रकार – फक्त तुमच्या मतदारसंघातीलच शिक्षकांचं HRA बंद आहे हे राज्यभर शिक्षकांच बंद व्हायला पाहिजे.
आमदार प्रशांत बंब म्हणाले, ” मला बाकीच्यांच अजून माहित नाहीये. मला माझ्या मतदारसंघातील माहित आहे “.असेही ते म्हणाले.