राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार
राज्यात गारठा वाढला


नवीन वर्षाचे आगमन होताच पुन्हा थंडीचे पुनरागमन होणार आहे. पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढणार आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचे तापमान कमी झाले होते पण आता थंडीचा जोर वाढणार आहे. पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरुवारी किमान तापमानाचा पारा १३.४ अंशांपर्यंत घसरला शुक्रवारपासून पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घसरण होत आहे .उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे नाशिक, धुळे ,जळगाव ,नंदुरबार, आणि अहिल्यानगर मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील प्रमुख जिल्हे नागपूर, अमरावती, अकोला, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढणार आहे.अधीक तीव्रतेने जाणवणार आहे. उत्तर भारतातील थंडी दक्षिण भारताकडे वळाल्यामुळे महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यांत सुद्धा हवामानात बदल पहावयास मिळणार आहे. असा अंदाज हवामान खात्याच्या अभ्यासकांनी दर्शवला आहे.