

मुंबई : चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन याला मुंबईतील डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अभियांत्रिकीची पदवी प्रदान करण्यात आली आहे. कार्तिक आर्यनं अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर तब्बल १० वर्षांहून अधिक काळानंतर त्याला इंजिनिअरिंगची पदवी मिळाली आहे.त्यांनी लिहिले, “माझ्या दीक्षांत समारंभासाठी मागच्या बाकावर बसण्यापासून ते स्टेजवर उभे राहण्यापर्यंतचा प्रवास. हा एक सुंदर प्रवास होता. डीवाय पाटील विद्यापीठ, तुम्ही मला आठवणी, स्वप्ने दिली आणि आता, अखेर, माझी पदवी अगदी एका दशकात अनुभवली.” तसेच विजय पाटील सर, माझे शिक्षक आणि येथील तरुण स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचे प्रेमाबद्दल आभार. घरी आल्यासारखे वाटते.” असे कार्तिकने आपलं मत व्यक्त केले आहे. कार्तिक आर्यनं महाविद्यालयाला भेट दिली आणि त्याच्या शिक्षकांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांसोबत त्याचे महाविद्यालयीन अनुभव शेअर केले. शेअर केले त्याचा अनुभव ऐकून विद्यार्थी अक्षरशा भारावून गेले होते. नंतर कार्तिकने स्टेजवर येऊन त्याच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या शीर्षकगीतावर विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले तेव्हा त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.