कैलास बोराडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोन; "काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे"
यातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल

जालना:भोकरदन तालुक्यातील कैलास बोराडे (३६ ) यांना चुलीत लोखंडे सगळे गरम करून शरीरावर १६ चटके दिल्याचा सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कैलास बोराडे यांच्या उपचारासाठी मदत केली आहे.
ते म्हणाले की “कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी व माणुसकीला काळीमा फासणारी, अमानुष आहे. यातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.पीडित बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य शासन करेल. याबाबत जालना पोलिस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. या घटनेतील गुन्हेगारांना मकोका लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल. बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले असून त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे