केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय! ८ व्या वेतन आयोगाला मंजूरी
८व्या वेतन आयोगामुळे फक्त आर्थिक लाभच नव्हे, तर कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ व्या वेतन आयोग देण्यास सहमती दर्शवली आहे. अनेक महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान या आठव्या वेतन आयोगामुळे १.२ कोटी होऊन अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा होणार आहे याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षी सादर केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.
सातव्या वेतन आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचारी या संदर्भातील घोषणा होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. केंद्रीय मंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, १९४७ पासून ७ वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी नियमित वेतन आयोग तयार करण्याचे वचन दिले होते, त्यानुसार ७ वा वेतन आयोग २०१६ मध्ये सुरू करण्यात आला होता, जो २०२६ पर्यंत चालणार होता, परंतु त्याच्या एक वर्ष आधीच सरकारने त्याला मान्यता दिली आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांपर्यंत वाढला. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वारंवार सुधारणा करण्यासाठी शिफारसी करण्यासाठी दर १० वर्षांनी एकदा वेतन आयोगाची स्थापना केली जाते. महागाई नुसार पगार आणि पेन्शनमध्ये वाढ केली जाते.
• किमान वेतन आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होऊ शकेल. ती वाढ ५१ हजार ४८० रुपये होऊ शकते.
सध्या किमान मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. यासोबतच निवृत्तीवेतन धारकांनाही हाच लाभ मिळणार आहे. त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या ९ हजार रुपयांवरून २५ हजार ७४० रुपयांपर्यंत वाढणार आहे.
• महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत बदलआयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) यामध्येही मोठा बदल अपेक्षित आहे. यामुळे सक्रिय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारक दोघांनाही फायदे होणार आहेत.
• कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणसरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 8 व्या वेतन आयोगामुळे फक्त आर्थिक लाभच नव्हे, तर कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची अपेक्षा आहे.