१ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना (एच एस आर पी) नंबर प्लेट लावणे बंधनकारक..!

मुंबई: एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) नंबर प्लेट लावणे सुप्रीम कोर्टाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, राज्यात वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू झाले आहे.अंतिम मुदत ३० एप्रिल आहे.
मात्र, १ एप्रिल २९१९ पूर्वी किती गाड्यांची नोंदणी झाली आणि त्यांपैकी किती वाहनांना या प्लेट्स लावल्या गेल्या आहेत, याचा संपूर्ण आढावा परिवहन विभाग घेणार आहे. त्यानुसार, मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे, लोकांनी गोंधळून जाऊ नये, असे परिवहन विभागाकडून आवाहनही करण्यात केले आहे.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?लावणे का आवश्यक?केंद्रीय मोटार नियम १९८९ च्या नियमानुसार, सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ लावणे बंधनकारक आहे. ज्यांनी १ एप्रिल २०१९ नंतर गाड्या खरेदी केल्या आहेत, अशा गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेट्स आहेत. मात्र, त्याआधीच्या गाड्यांना या नंबर प्लेट्स नाहीत. अशा सर्व गाड्यांना आता या नंबर प्लेट्स बंधनकारक आहेत, एचएसआरपी नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाते.HSRP नंबर प्लेटचे दरया प्लेटचे महाराष्ट्रातील दर इतर राज्यांच्या बरोबरीचे, किंवा कमी आहेत, असा दावा परिवहन आयुक्तांनी केला आहे.
काही राज्यांच्या दरांचा अभ्यास करून या प्लेटचे दर ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात ४५० रुपये दुचाकी साठी, ५०० रुपये तीन चाकीसाठी आणि ७४५ रुपये चारचाकीसाठी दर असणार आहेत. ज्यांना प्लेट्स लावायच्या आहेत, त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच नोंदणी करावी, काही लोक याबाबत फसवणूक करत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
मुदतवाढीचा निर्णय आढाव्यानंतरदरम्यान, एप्रिल २०१९ पूर्वी मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी झाली आहे. त्यामुळे, अशा गाड्या किती आहेत, याचा अंदाज परिवहन विभागाला घ्यावा लागणार आहे. एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. मात्र, त्याच वेळी परिवहन विभाग आढावा घेणार आहे.
त्यात किती वाहनांना या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत, किती गाड्या नंबर प्लेट लावण्यासाठी शिल्लक आहेत, याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर, गरज असल्यास मुदत वाढ दिली जाईल.
महत्वाचे मुद्दे:एचएसआरपी नंबर प्लेट लावणे १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांसाठी अनिवार्य.अंतिम मुदत: ३० एप्रिल.मुदतवाढीचा निर्णय आढाव्यानंतर घेतला जाईल.फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच नोंदणी करावी.